गणसंस्कृती असलेल्या काळातील गणाचा प्रमुख म्हणजे गणपती !!!
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
भारतात विविध संस्कृती असल्याची नोंद पुरातत्व विभागाने मोहनजोदडो, हडप्पा उत्खनन करतांना केली. त्याच वेळी पुर्वी सिंधु संस्कृतीच आपली मूळ संस्कृती असल्याचे सिध्द झाली. उत्तम नगर रचना, सुविधायुक्त, हवेशीर घरे, पाण्याची सुंदर मांडणी त्यात दिसून आली. पुरातत्व विभागाने ह्या संस्कृतीत निॠती ही गणमाता असल्याचे सिध्द केले. ह्या काळापासून गणसंस्कृती दिसून येते. राजेशाहीत प्रभावी गणपध्दती होती. गण म्हणजे राजेशाहीत काम करणारा, सर्वांचे हित पाहणारा समुह जो स्वतःच गुणांनी युक्त होता. राजेशाहीत राज्य कारभार चालविण्यासाठी अनेक गण असायचे..सुभा,परगण ही नावे त्या काळातील होती. पुढे राजेशाहीत सरदार, सरसेनापती, देशमुख, पाटील, कुलकर्णी, चौधरी ही पदे राज्य चालविण्यास मदत करित..गणसंस्कृती समतेने नांदणारी संस्कृती होती. गण हे अन्याय होणार नाही अशी काळजी घ्यायचे. त्या काळात व त्यापुढे अनेक गण तयार झालेत. त्यात शाक्य, कोलिय, मौर्य इ. होत. शाक्य गणात शुध्दोधन राजा होता. त्याचा पुत्र सिध्दार्थ हा गणाचा पती होता. त्यामुळे त्याला गणपती म्हणत. कोलीय गणातुन सिद्धार्थ ची आई महामाया आलेली होती. त्याकाळचा कोलिय आजचा कोळी समाज होय. अशा पध्दतीने गणसंस्कृती होती.सिध्दार्थ गौतम यांनी सर्व पंथाचा, मार्गाचा, धर्माचा अभ्यास करुन अष्टांगिक मार्ग सुचविले. दुःखावर अष्टांगिक मार्ग हा उपाय सांगितला. त्याच्यांकडे 8 प्रकारचे विनय होते. त्यामुळेच त्यांना अष्टविनायक म्हणतात. मौर्य हा गणसंस्कृतीचा वाहक होता. चंद्रगुप्त मौर्य याला गणपती बाप्पा मोरया म्हणत. तो गणाचा पती होता.संत तुकारामांचे पूर्वज हे मौर्य होते. आता ते कुणबी समाजातील मोरे बनले. अशोक सम्राट हा बहुजनाचा राजा..धनगर समाजातुन म्हणजे भटक्या म्हटलेल्या जातीतून पुढे आले. राजा कनिष्क हा सुध्दा समतेचा पुरस्कार करणारा राजा..आर्यांनी ग्रंथ लिहतांना पूर्वी झालेल्या गणपतींना काल्पनिक मांडून शिवपुराण, स्कंदपुराण यात गणपतीच्या उत्पत्ती संदर्भात कथा आहे. शिव व पार्वती हे बहुजन नायक,नायिका होत. पार्वती ही आंघोळ करतांना काढत असलेल्या मळातून रक्षणासाठी बालक बनविते. त्यात जीव ओतल्याने तो मळातून सजीव होतो. अचानक शंकर घरी आल्याने त्याला पार्वतीला भेटायला बालक जाऊ देत नाही. शंकर त्यांचे शीर उडवितो. पार्वती आंघोळीनंतर बाहेर येते तर पाहते बालकाला ठार केलेले होते. ती शंकरास त्याला जीवंत करण्यास सांगते. शंकर जंगलात जातो जो प्राणी प्रथम भेटेल त्याचे शीर आणतो. प्रथम हत्तीचे पिल्लू भेटल्याने बालकाला त्या हत्तीच्या पिल्लूचे शीर लाऊन जीवंत करतो. अशा कथा गणसंस्कृती नष्ट करण्यासाठी प्रतिगाम्यांनी रचल्या. रामाची कथा दशरथ जातक कथेवरुन निर्माण केली गेलेली आहे.विज्ञानात सुध्दा अशी ताकद नाही की एका व्यक्तिला, प्राण्याला दुसर्याचे शीर लाऊन जीवंत करता येइल. पाली भाषेत गौतम बुध्दाने अष्टांगिक मार्गासाठी चित्त जे शरीराशी निगडीत आहे. तसेच मल्ल म्हणजे मळ ह्या दोन्ही गोष्टी शुध्द असाव्या लागतात तरच बुध्द विचाराकडे जाता येते. चित्त व मन शुध्द असल्याशिवाय तुम्हाला अष्टांगिक मार्गाकडे वळता येत नाही. पार्वतीने शरीर व मन मळ बाहेर काढून शुध्द केल्याचे प्रतीक आहे. हत्ती हा भारतात सैनेत वापरले जाणारा प्राणी होता. हत्तीचा उपयोग अनार्य म्हणजे मूळ भारतीय लोकांनी तथा राजांनी केला. आर्य हे विदेशातून घोडे हे प्राणी घेऊन आले.
हत्ती हा हुशार प्राणी त्यामार्फत राजाची निवड केली जाण्याचे पुरावे जुन्या ग्रंथात मिळतात. राजाच्या गळयात हार घालून राजाची निवड हत्ती हा प्राणी करायचा….शिवपुराणातील ही शंकर पार्वतीची काल्पनिक कथा गणपती उत्सवासाठी जोडली आहे. महादेव ज्या देवाला त्रिनेत्र असलेला देव समजतात त्यांना जगाचे ज्ञान मग त्यांना पार्वतीने बनविलेला बालक ओळखता येऊ नये हे चमत्कारीक बाब आहे. भारतात प्रत्यक्ष झालेल्या राजे शिवबाची जयंती महात्मा फुलेंनी साजरी करण्याचे पुरावे मिळतात. गणेश उत्सव व शिव जयंती लोकमान्य टिळकांनी सुरु केलेले उत्सव आहेत. त्यांचा उद्देश स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांचा सहभाग वाढावा हा होता. आज कोटयावधी पैसा प्रत्येक सणावर केला जातो. साधी बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती अमाप पैसा खर्च करुन करतो. त्यांचे विचार जीवनात न आणता केवळ डी. जे, खानावळी उठवून जयंती साजरी होते. अशाच पध्दतीने सर्व समाजात महापुरुषाच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या होतात. अगदी साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा केला पाहीजे. विविध स्पर्धा, वैचारिक कार्यक्रम,प्रबोधन, प्रश्नमंजुषा, भाषणे, आरोग्याची शिबीरे, गरजुंना मदत, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत असे अनेक कार्यक्रम घेता येतात. बरीच मंडळात व्यसनी मुले असतात ते ह्या उत्सवाचा गैरफायदा घेतात. राजकारणी ह्या तरुणांनी पैसे देऊन वापरुन घेतात. ही त्यांची वोटर बँक असते. हे करित असतांना सर्व धर्माचा आदर ठेवला गेला पाहिजे. गणपतीच्या नावावर मागेच मुख्यमंत्री मनोहर जोशी असतांना गणपती दुधपिण्याची अफवा पसरललेली होती. अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाटय बनवून मानवकेंद्रीत वग, लावणी, शाहिरी बनविले. गणपती विसर्जन करतांना पूज्य भावाने बसविलेली मुर्ती आवेशाने फेकतात. नदी, नाले, विहिरी, समुद्र, खाडया, तलाव खराब होतात. कमी खर्चीक इको फ्रेंडली गणपती बसविले पाहिजे. सर्जनशील, विवेकनिष्ठ, विचारप्रवर्तक, समाजहिताचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे. देश विविध जाती धर्माचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे. आपण धार्मिक असू तर आपली सर्वाना घेऊन चालण्याची जबाबदारी जास्तीची आहे
पत्रकार तथा लेखक
एस. एच. भवरे