पाडळसे धरण* केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट केल्या शिवाय पुर्ण होणार नाही.- प्रा. अशोक पवार.

0

अमळनेर Express news

अमलनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण २६ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आजी,माजी आमदार (मा.साहेबरावदादा, मा.शिरीषदादा, मा.अनिल दादा ) यांना पाडळसे धरणाविषयी चर्चा करण्यासाठी जाहिर आवाहन केले होते. जनतेचे प्रश्न व दादांचे उत्तर, असा संवादाचा कार्यक्रम नागरी हित द‌क्षता समितीने साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे आयोजित केला होता. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फक्त मा.आ. साहेबराव पाटील उपस्थित होते. मा.शिरीषदादा मा.अनिल दादांनी सदर कार्यक्रमाला पाट दाखविली. प्रथमतः संदिप घोरपडे यांनी धरणविषयावर अभ्यासपूर्ण भुमिका विषद केली. प्रास्ताविकात मा प्रा.अशोक पवार यांनी सांगितले की पाडळसे धरणासाठी आजच्या स्थितीत अजून १७०२ हेक्टर जमीन अधिग्रहित करावयाची आहे. भूसंपादनासाठी मा.जिल्हाधिकारी यांचे कडे प्रस्ताव पाठवूत ३ वर्षे झाली. परंतु पैसे नसल्याने भूसंपादन झाले नाही. अजून ४०% सात्री व शेंदणी गावांचे पुर्ण पुर्नवसन बाकी आहे, अशा परिस्थितीत ५ उपसा जलसिंचन योजनांची निविदा काढणे हास्यास्पद आहे. कारण उपसा सिंचन योजना धरणाच्या पैशांतून करावयाची आहे. धरणाचे पहिला टप्पांचे काम सन.२०२७-२८ पर्यंत पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ५०० कोटीची आवश्यकता आहे, असे प्रकल्प कार्यालयाचे मत आहे. आज ५ वर्षातही ५०० कोटी निधी मिळत नाही. मा.आ.साहेबराव पाटील यांनी ५ वर्षात फक्त १३८ कोटी निधी आणला, तर मा.आ.शिरिष चौधरी यांनी केवळ १६६ कोटी रुपये आणले.विद्यमान आमदार,मंत्री यांनी ३६२ कोटी रुपये आणले तर १०० कोटीची तरतूद केली आहे .पण तो अप्राप्त निधी आहे.

पाडळसे धरण केंद्राच्या कोणत्याही योजनेत समाविष्ट झालेले नाही. या साठी तिन्ही दादा आमदार अपयशी ठरले आहेत.मंत्री अनिल पाटील यांनी दिलेले वचननाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.” अवर्षण प्रवण क्षेत्र”” विशेष बाब “म्हणून धरणाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करा,एवढेच भांडवल आपल्या कडे आहे.
दोंडाईचा येथील प्रास्तावित औष्णिक वीज प्रकल्पातून पाडळसे धरणासाठी ७१६ कोटी रुपये मिळणार होते, परंतु माजी आ. शिरिष चौधरी यांच्यामुळे मिळाले नाहीत हि बाब चर्चेत स्पष्ट झाली. मार्च २०२४ अखेर ८७४ कोटी रुपये धरणावर खर्च झाले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २८८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. 2027-28 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण न झाल्यास पुन्हा धरणाची किंमत वाढेल व हे अजून पंधरा-वीस वर्षे सुरू राहील असा अंदाज नागरिकांनी चर्चे प्रसंगी व्यक्त केला .पहिल्या टप्प्याचे धरणाचे काम झाले तर अमळनेर तालुक्यातील फक्त ६७ गावांची जमीन सिंचनाखाली येणार आहे. २०३२ पर्यंत कोरडवाहू शब्द काढून बागायती येणार ही नेहमीप्रमाणे मंत्र्यांनी मारलेली थाप आहे, खोटं चित्र निर्माण करून मंत्र्यांनी जनतेची दिशाभूल करू नये असे नागरिकांनी चर्चेत सांगितले . २५६५७ हेक्टर जमीन पहिल्या टप्प्यात सिंचनाखाली येणार आहे. यात अंमळनेर शिवाय अन्य तालुक्याचा हि समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत धरण हा मुद्दा उपथित करू नये , क रायचा असेल तर अभ्यास करून यावे, जनतेची दिशाभूल करू नये अशी मागणी अमळनेर ,नागरी हित दक्षता समिती करत आहे ..यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास नागरी हित दक्षता समिती अमळनेर चे सर्व सदस्य, धरण संघर्ष समितीचे सदस्य, गौतम मोरे ,बन्सीलाल भागवत,तिलोत्तमाताई पाटील, प्रा . डॉ लीलाधर पाटील , सचिन वाघ, रिटाताई बाविस्कर, प्रा डॉ.राहुल निकम, संजय पुनाजी पाटील, उमेश धनराळे ,अजय भामरे, बापूराव ठाकरे ,भागवत सूर्यवंशी, धनंजय सोनार, डी. एम. पाटील भारती गाला, मनोज शिगाने, विक्रांत पाटील ,गोकुळ बोरसे, रणजित शिंदे, दीपक तिवारी ,पंकज चौधरी अमळनेर शहरातील पुरोगामी विचारांचे आणि धरण याविषयी कळकळ असणारे दक्ष नागरिक कार्यक्रमास उपस्थित .होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!