साहेबांच्या राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा , युवकांचा मित्र , परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता श्याम पाटील…!
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व २०१६ साली अमळनेर शहरातील प्रभाग क्र. ७ मधून नगरसेवक म्हणून नगरपरिषदेवर लक्षणीय फरकाने निवडून जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात लक्षवेधी व वैशिष्ठपूर्ण कामे करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील ते लक्षणीय काम करत असतात त्यांचे अमळनेर शहरातील सर्वच जाती धर्माच्या लोकांशी सलोख्याचे संबंध असून राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ते युवकांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात त्यांच्या या कामाची दखल व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी युवकांना संधी देणार असल्याचे केलेले वक्तव्य याचे महत्व ओळखत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी येणाऱ्या अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी श्याम पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असून आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे