९८ व्यां साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
- मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्यांमधून एका लेखकाला त्यांचे साहित्य विश्वातील योगदान पाहून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यापूर्वी कराडचे ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री माझी प्राचार्य रेखा दीक्षित, मुंबईच्या स्मिता राजमाने, ठाण्याच्या ज्येष्ठ गजळकार निलाताई वाघमारे, नागपूरचे, डॉ रवींद्र शोभणे, पुणे येथील डी भारत सासणे, ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदि मान्यवरांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल
यंदाचा हा सन्मान सांगलीच्या डॉ तारा भवाळकर याना लाभला आहे, त्यांच्या निवासस्थानी त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देऊन, ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले याप्रसंगी नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, कराड चे ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सिद्धार्थ कुलकर्णी, नांदेड चे ज्येष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ, राज्य शासनाचे साहित्य संसृती मंडळाचे सदस्य प्रा सप्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते या मराठी साहित्य मंडळाच्या जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्काराने साहित्य विश्वात विशेष आनंद व्यक्त होत आहे