गोदावरी फाऊंडेशन व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर संपन्न
गोदावरी फाऊंडेशन व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर संपन
व्हाॅईस ऑफ मीडिया, मंगळग्रह सेवा संस्था, वृत्तपत्र विक्रेते यांच्या कुटुंबीय सहभागी
अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्हाॅईस ऑफ मीडिया, मंगळग्रह सेवा संस्था, वृत्तपत्र विक्रेते बांधव यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, जयश्री साबे, उज्ज्वला शहा, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, प्रकाश मेखा, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम शिबिराचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, गोदावरी फाउंडेशनचे डॉ. दिनेश चौधरी, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. शुभम कॉलरा, डॉ. सुमित भोसले, डॉ. तेजस सोनवणे, डॉ. कुशल धांडे, डॉ. अभिलाश मोवाळे, डॉ. जान्हवी मापारी, डॉ. अजय राख, डॉ. तुषार चले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. यावेळी गोदावरी फाऊंडेशन कडून आलेल्या सर्व टीम चा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले प्रास्ताविकात म्हणाले की, सर्वांनी आपापल्या कुटुंबातील आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा तरी करावी असे आवाहन करत शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, ईसीजी (कार्डिओग्राफ), २ डी इको यंत्राद्वारे रुग्णांची तपासणीसह उपचार, निदान तसेच मार्गदर्शन करण्यात आले. यात नाक कान घसा विकार, नेत्र विकार, मुळव्याध, पोटाचे विकार, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, हृदयरोग, स्त्री रोग तपासणी करण्यात आल्या. मोफत औषध वितरणही करण्यात आले. जिल्हा मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव प्रविण माळी, खजिनदार रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष निलेश पाटील, ज्येष्ठ सभासद नरेंद्र पाटील यांनी मोफत औषधे उपलब्ध करुन दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर आभार डी. ए. सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळग्रह संस्थेचे मंगल सेवेकरी तसेच गोदावरी फाउंडेशनचे मोहम्मद हुसेन, रुतूजा अवाघडे, श्रावण कऱ्हार, रितेश पोटोळे, रितू भिलावेकर, प्रिती वसावे, प्रतीक्षा दाते यांनी विशेष परिश्रम घेतले.