अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…

0

अमळनेर Express news

आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील.

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक यांचे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील नक्षत्र लॉन्स येथे सत्यशोधक समाज संघाच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात “आदर्श महामाता ” या पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या ऐतिहासिक राज्य अधिवेशनाचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ चे संचालक डॉ.ज्ञानेश्वर गोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर, सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक चोपडे, डॉ.राजेंद्र कुंभार, डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा.सुभाष वारे, प्रा.अनंत राऊत, सत्यशोधक उत्तमराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, विश्वस्त विश्वासराव पाटील, डॉ.डी बी शेंडे, धर्मकीर्ती महाराज, दादा महाराज पनवेलकर, प्रा.डॉ.शेख एजाज, प्रा.प्रतिमा परदेशी, डॉ.वंदना महाजन, कॉ.स्मिता पानसरे, सुनीता भोसले, जयश्री बागुल उपस्थित होते.
यापूर्वी पी डी पाटील यांचे “आदर्श महामाता ” या पुस्तकाचे प्रकाशन सत्यशोधक समाज संघ आयोजित महिला राज्य अधिवेशन ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी १० मार्च २०२४ रोजी नायगाव येथे प्रकाशन झाले होते. व आता ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जन्मगावी जि.अहिल्यानगर येथे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.
आदर्श महामाता या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, सत्यशोधक ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, सत्यशोधक फातिमाबी शेख, सत्यशोधक त्यागमूर्ती माता रमाई या सर्व महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार असे प्रतिपादन पाटील यांनी केले. दोन दिवसीय अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनात वैचारिक मंथन झाले. शिक्षण, कृषी, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, संविधान, लोकशाही अशा विविध विषयांवर चर्चा – संवाद -प्रबोधन झाले असुन तमाम महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी या अधिवेशनाचा आस्वाद घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!