मारवड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
मारवड, मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील सरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. तर सुत्रसंचलन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. दिलिप कदम यांनी बाबासाहेबांचे भारतीय संविधानाच्या निर्मितीतील महत्वपूर्ण योगदान यावर माहिती दिली.
तर अध्यक्षिय भाषणात उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांनी दीन दलितांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची ओळख करून देत, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या वाक्याचा मतितार्थ समजावून दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महीला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.