साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह 2024* बक्षिस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.
अमळनेर Express न्युज नेटवर्क —
अमळनेर( प्रतिनिधी)- खानदेशातील मुलूक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकऱ्यांचे प्रश्ना साठी विधानसभेत शिंगाडा दाखवणारे आणि मोर्चा करणारे लढवय्ये नेते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अमळनेर जि. जळगाव छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.साथी गुलाबराव पाटील सामाजिक आणि राजकीय ( पुरोगामी) पुरस्कार ,राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक पुरस्काराचा पहिला मान धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि हरिजन सेवक संघाचे राज्यसचिव राजेंद्र छात्रालयाचे संचालक मा. मधुकर भोजू शिरसाठ यांना देण्यात आला. त्याचबरोबर साथी गुलाबराव पाटील राजकीय (पुरोगामी) पुरस्कार प्रथम वर्षाचे मानकरी प्रा. सुधीर अण्णाजी गोतमारे (सरपंच )खुर्सापुर जि. नागपूर यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला यावेळी प्रास्ताविकात अंमळनेर शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी स्मृतीशेष गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आणि कार्यक्रमाच्या पुरस्कारांवर माहिती दिली नंतर राज्यस्तरीय साथी संदेश वक्तृत्व करंडक 2024 स्पर्धेचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांचे मनोगत झाले. सामाजिक पुरस्काराचे प्रथम वर्षाचे मानकरी माननीय श्री मधुकर भोजू शिरसाठ यांना 21000/- रु रोख,शिंगाडे धारी गुलाबराव यांची प्रतिकृती,लालटोपी, रुमाल, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी बापू च्या सोबत जो काळ घालवला त्यावर नजर टाकली आणि बापूंचे कर्तुत्व आणि त्यांचे काम दीन,दुबळ्या, गरिबांसाठी किती महत्त्वाचं होतं हे पटवून दिले आणि त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला याबद्दल आयोजकांचे आभार मानले .मानाचा समजला जाणारा राजकीय (पुरोगामी )पुरस्कार प्रथम वर्षाचे मानकरी प्रा. सुधीर अण्णाजी गोतमारे (सरपंच) खुर्सापुर जि. नागपूर यांना 21000/- रु रोख, शिगांडे धारी गुलाबराव यांची प्रतिकृती,लालटोपी, रुमाल,प्रशस्तीपत्र सन्मानाने प्रदान करण्यात आले. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात गावाचा विकास कसा करावा याबद्दल माहिती दिली एक सरपंच 47 कोटीची कामे आपल्या गावात आणू शकतो. यावर नजर टाकली.गावातील सर्व शाळा कार्यालय आय.एस.ओ. नामांकित आहेत हे नमूद केले. गावाचा विकास करताना मा. आ. गुलाबराव पाटील यांच्यासारखे नेते आम्हाला प्रेरणा देतात आणि आपण मला साने गुरुजी नगरीमध्ये माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या नावाने पुरस्कार दिला हे माझे भाग्य समजतो असे नमूद केले. वक्तृत्व स्पर्धा पुरस्कारात प्रथम आलेल्या कल्याण येथील यश पाटील याला 11000- रु रोख शिगांडे धारी गुलाबराव यांची प्रतिकृती, लालटोपी, रुमाल प्रधान करण्यात आला. हा पुरस्कार लोकसभातून माध्य शाळेतील शिक्षक शुभम श्रीप्रकाश निकम यांनी कै.पुंडलिक केशवराव निकम रा.धामणगाव. ता.चाळीसगाव यांच्या स्मरणार्थ दिला.द्वितीय पुरस्कार कु.कोमल शेलार (मालेगाव) हिला 9000/- रु रोख. अमळनेर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे आणि आणि संचालक मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक पुरस्कार वरुन घरटे ( पुणे) यास 7000/- रु रोख सानेगुरुजी विद्यामंदिर येथील शिक्षक, पत्रकार बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे) यांच्या तर्फे कै.गं.भा.अंजनाबाई आनंदराव ठाकरे रा.मंगरूळ ता.चोपडा यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत( सागर) पाटील सचिव संदीप घोरपडे सर,उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील. सहसचिव अँड. अशोक बाविस्कर. अमृत पाटील .डॉ.यशवंतराव देशमुख .प्राचार्य, डॉ. सेख शकील जलालोद्दीन .भास्कर पाटील .मगन पाटील. किरण पाटील (पत्रकार ).युवराज सोनवणे. विलास चौधरी (शिक्षक प्रतिनिधी) मुख्खा.संजीव पाटील .मुख्खा.सुनील पाटील मुख्खा.अनिता बोरसे. वैशाली चव्हाण ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि अमळनेर नगरीचे सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्खा. श्रीमती अनिता बोरसे,जी. एस. पाटील सर यांनी केले.आभार अँड. अशोक बाविस्कर यांनी मानले.