मध्यमिक विद्यालय पष्टाने बुद्रुक येथे ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
माध्यमिक विद्यालय पष्टाने विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. प्रथमता सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष दयाराम पाटील, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब वाय जे सोनवणे, विद्यालयाचे शिक्षक एस एन अहिरे. आर व्ही पाटील, जी एन वानखेडे, श्रीमती ए सी पाटील, आर एस पवार, तसेच शिक्षकेतर कर्मचारी राहुल सैतवाल ,या सर्वांनी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले .विद्यार्थी प्रतिनिधींनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन चरित्रावर मनोगते व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब वाय जी सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षिततेची विस्तृत माहिती सांगितली. एस एन अहिरे यांनी राधाकृष्णन यांच्या महान कर्तृत्वावर प्रकाश टाकला .आर व्ही पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले .शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री दयाराम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान अशा शिक्षण विषयक कार्याबाबतीत माहिती सांगितली. असा काळ की ज्या काळात मुलींना शिकू दिले जात नव्हते अशा काळात सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढुन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले व या कामी त्यांना फातिमा शेख यांनीही मोलाची साथ दिली. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वृषाली पाटील हिने केले आभार प्रदर्शन डॉली सतीश पाटील या विद्यार्थिनींनी केले.