जिल्हास्तरीय शालेय मुली गट डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न :* *विभागीय स्पर्धेसाठी रायसोनी विद्यालय,स्वामी विवेकानंद महाविद्यालय, इंदिराबाई ललवाणी विद्यालय व आर.एन.राठी विद्यालयाचे संघ पात्र
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित आज जिल्हास्तरीय शालेय महानगरपालिका क्षेत्रीय व उर्वरित जिल्हा क्षेत्रीय १७ व १९ वयोगट डॉजबॉल मुली स्पर्धा बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आल्या स्पर्धेचा निकाल याप्रमाणे.
🔹 *म.न.पा.क्षेत्रीय १७ वयोगट मुली*
*विजयी :* बी.यू.एन.रायसोनी मराठी स्कूल जळगाव.
*उपविजयी :* बालविश्व विद्यालय जळगाव
*तृतीय :* आर.आर.विद्यालय जळगाव.
*म.न.पा.क्षेत्रीय १९ वयोगट मुली*
*विजयी :* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव.
*उपविजयी :* महाराणा प्रताप उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव.
*तृतीय :* स्व.एस. ए.बाहेती कनिष्ठ महाविद्यालय जळगाव.
🔹 *जिल्हास्तरीय उर्वरित १७ वयोगट मुली*
*विजयी :* इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर.
*उपविजयी :* सारजाई कूडे विद्यालय धरणगाव.
*तृतीय :* अ. म. वारके विद्यालय विदगाव.
*जिल्हास्तरीय उर्वरित १९ वयोगट मुली*
*विजयी :* आर.एन.राठी उच्च माध्यमिक विद्यालय भोकर.
*उपविजयी :* इंदिराबाई ललवाणी उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर.
*तृतीय :* ए.एस.सी.कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव.
आजच्या सामन्याचे नाणेफेक क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष अध्यक्ष प्रशांत कोल्हे,मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, जिल्हा युवा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील, मुख्याध्यापक सचिन महाजन, जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनचे राहुल साळुंखे, सचिन सूर्यवंशी,जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे, जिल्हा महिला क्रीडा शिक्षक महासंघाच्या डॉ.कांचन विसपुते, समिधा सोवनी, जयश्री माळी, चारुशिला पाटील, क्रीडा कार्यालयाचे संजय महिरे यांनी केले.
स्पर्धेत तांत्रिक समिती प्रमुख म्हणून गिरीश पाटील तर पंच प्रमुख म्हणून जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे तर पंच म्हणून नितीन पाटील, विनायक सपकाळे, प्रा.समीर घोडेस्वार, प्रकाश सपकाळे,धीरज जावळे,आदित्य वाघ,संकल्प राजपूत,मयुर चांडे यांनी काम पाहिले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव,विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन तर हरीभाऊ राऊत, प्रमोद पाटील ,अनिल अंभोरे यांचे तसेच डॉजबॉल प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*योगेश सोनवणे : सचिव : जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन.*