पंढरपूर येथे धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा*
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
अमळनेर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे यासाठी माऊली हळणकर ,दीपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर ,गणेश केसकर, योगेश धरम हे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असून महाराष्ट्रात धनगर समाजात तीव्र असंतोष असून धनगर व धनगड एकच असून 1956 च्या एसटी यादीत महाराष्ट्राच्या अनुजमातीत यादीत अनुक्रमांक 36 वर धनगड आल्याने धनगर जमात त्यांच्या संवैधानिक हक्कापासून गेली 68 वर्षापासून वंचित आहे. वास्तविक धनगड नावाची जमात जगात कोठेही अस्तित्वात नाही .महाराष्ट्र सरकारने मा. मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा लेखी लिहून दिले आहे. तात्काळ महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र देण्यात यावे .समाजास न्याय द्यावा यासाठी *बन्सीलाल भागवत -राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र, हरचंद लांडगे – माजी शहराध्यक्ष भाजपा ,एस. सी. तेले- तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल, रमेश शिरसाठ-अध्यक्ष हमाल मापाडी संघ अमळनेर, गोपीचंद शिरसाठ-ता. अध्यक्ष मौर्य क्रांती संघ अमळनेर, विजय मोरे- संघटक ,जितेंद्र भालेराव युवक उपाध्यक्ष यांनी भेट देऊन बन्सीलाल भागवत यांनी आरक्षण मिळावे तसेच उपोषणकर्त्यांना काही झाल्यास महाराष्ट्र उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.*