धनगर समाजाचा जळगाव येथे रस्ता रोको आंदोलन .

0

अमळनेर Express news

अंमळनेर प्रतिनीधी

आकाशवाणी चौकात जळगाव येथे दिनांक 23- 9- 2024 रोजी पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून माऊली हळणकर ,दीपक बो-हाडे, यशवंत गायके, विजय तमकर ,गणेश केसकर, योगेश धरम हे उपोषणास बसलेले आहेत 1956 च्या अनुसूचित जातीच्या एसटी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत (S .T) अनुक्रम नंबर 36 वर धनगड आल्याने धनगर जमात यांच्या संवैधानिक हक्का पासून गेल्या 68 वर्षापासून वंचित आहे. वास्तविक धनगड नावाची जमात देशात काय जगात कुठेही अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सरकारने मा. मुंबई उच्च न्यायालयात लेखी तीन वेळा लिहून दिले आहे की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत परंतु धनगर आहेत. तरीसुद्धा एसटी अनुजमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे ही उपोषणकर्त्यांसह महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची मागणी असल्याने सरकारकडून न्याय मिळत नसल्याने दिनांक 23 9 2024 रोजी रस्ता रोको आंदोलन सकल धनगर समाज जळगावच्या वतीने सुभाष भाऊ सोनवणे ,सदाशिव ढेकळे बन्सीलाल भागवत ,एस .सी .तेले, रवींद्र लाळगे , वसंत भालेराव, अरविंद देशमुख, संदीप तेले, सुभाष करे, दिलीप धनगर ,अरुण ठाकरे प्रभाक नहाळदे, धर्मराज सोनवणे, गौरव ढेकळे, सुरेश पारखे ,रमेश सुशीर, रामचंद्र निळे, रमेश निळे, गणेश बागुल ,रेखा नहाळदे, मंजू सूर्यवंशी, प्रतिभा कंखरे ,ज्योती वाघ ,दिपाली धनगर, योगराज चिंचोरे, नानाभाऊ बोरसे, भारत पाटील ,पुरुषोत्तम पाटील, चंद्रशेखर सोनवणे, शामकांत वर्डीकर ,विष्णू ठाकरे हे उपस्थित होते. तसेच रास्ता रोको आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन सुभाष भाऊ सोनवणे ,सदाशिव दादा ढेकळे ,अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी केले .नंतर जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!