शानभाग विद्यालयाच्या तब्बल ११ खेळाडूंची साॅफ्टबाॅलच्या राज्य संघात निवड*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
_क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या विद्यमाने दिनांक २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संभाजीनगरला आयोजित ज्युनियर गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या शानभाग विद्यालयालयाच्या ११ खेळाडूंची निवड झाली आहे._
२२ सप्टेंबर रोजी जळगावच्या क्रीडा संकुलात झालेल्या निवड चाचणीत उत्कृष्ठ खेळाच्या बळावर मुलींच्या संघात मनाली कुलकर्णी, नंदिनी देसले ,आर्या ठोंबरे,रेणुका पाटील,प्रणाली पाटील,केतकी ईखे यांची तर मुलांच्या संघात वेदांत गायकवाड़, तनीष रामावत,वैभव पाटील,यज्ञेश त्रिपाठी,गणेश चौधरी यांची राज्य संघात निवड करण्यात आली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, दुपार प्रमुख स्वप्निल पाटील, सकाळ प्रमुख रुपाली पाटील, विद्यासमितीचे जगदीश चौधरी, गुरुकुलचे शशिकांत पाटील, सहप्रमुख विलास बोरसे यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक क्षितिज संजीवकुमार सोनवणे व प्रशिक्षक मयुरेश औसेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.