विना अनुदानित शिक्षकांची व्यथा समजून घ्या…
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी 🙏
जी भावना तुमच्यावर अर्थात राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट)
यावर आहे.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून टप्पा अनुदान साठी वाट पाहत आहोत.
काही मोजक्याच वर्षांनी आम्ही रिटायर्ड होणार तेही तुटपुंज्या वेतनावर, ना 100 टक्के पगार, ना पेन्शन.
अश्यातच परिवार, मुलांचे भविष्य कसे घडवायचे.
संपूर्ण महाराष्ट्र केवळ *अजित दांदाच्या एका सहीची* (अर्थमंत्र्यांची) आस धरून बसलाय. आम्हाला प्रचलित नाही तर किमानएक टप्पा अनुदानचा वाढावा, हीच अपेक्षा. 🙏
मा.ना.अनिलदादा पाटील आपण अजितदादा यांचे सहनिकट आहात. जर येणाऱ्या शुक्रवार पर्यंत दादांनी सही नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक अजितदादांच्या विरोधात उतरेल. इतर योजनांना अजितदादांची सही होते मग फक्त विनाअनुदानीत शिक्षकांच्या फाईलवर सही करायला पेन उपलब्ध होत नाही की काय. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व फडणविस साहेब सर्व अनुकूल असतांना अजितदादांचाच विरोध का?
आपल्याला एक विनंती करण्यात येते की येणाऱ्या शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेट मीटिंग आधीच आपण आपल्या वतीने अजितदादांना टप्पा अनुदान फाईलवर मंजुरीसह सही करण्यास भाग पाडावे. अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक संघटना आपल्या पक्षाच्या विरोधात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) विरोधात तालुका-तालुक्या तुनपेटून उठेल.
धन्यवाद.🙏
आपला एक पिढीत सानुग्रह शिक्षक…..
(विना अनुदानित शिक्षक)
989068774
प्रा विजेंद्र