बळीराजा शिवार फेरी निमित्त जवखेडा गावात शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
दिनांक १९ , २६ , २८ जून २०२४ रोजी जवखेडा व परिसरात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे काही शेतांमध्ये करण्यात आले परंतु त्यांची नावे लाभार्थींच्या यादीत आले नाहीत व त्यांच्या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पंचनाम्यासाठी कृषी सहाय्यक किंवा संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आले नसल्याच्या तक्रारी आम्ही बळीराजा शिवार फेरी निमित्ताने जवखेडा येथे गेलो असता शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या त्यावेळी आम्ही त्याच ठिकाणी कृषी सहाय्यक सौ.दिपाली सोनवणे यांना बोलावून माहिती घेतली तसेच शुक्रवारी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व शेतकऱ्यांना घेऊन येणार असल्याचे कळविले होते परंतु तालुका कृषी अधिकारी उपस्थित राहिले नाहीत यावेळी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन त्याठिकाणी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली असता तिथे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी येऊन सर्व शेतकऱ्यांची नावे घेऊन शासनास सोमवारी लगेच प्रस्ताव सादर करत असल्याची माहिती दिल्यानंतर सर्व शेतकरी समाधानी झालेत व आंदोलन स्थगित करण्यात आले