राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी उद्योग राहू द्या महाराष्ट्राला…तुम्हीच जा गुजरातला…!
बुधवार ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे अमळनेर रेल्वे स्टेशन येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट काढून देत गुजरात पाठवण्यात आले
हे सरकार सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला आहे
प्रचंड बेरोजगारी वाढत चालली असून तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे त्या विरोधात आज अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खोके सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…!