साने गुरुजी विद्यालयात शारदीय नवरात्रोत्सव संपन्न
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
🔅 *नवरात्र म्हणजे स्त्री-शक्तीचा सन्मान !*
🔅 *नवरात्र म्हणजे स्त्री-शक्तीचा जागर !*
आपल्या आजूबाजूला सुद्धा विविध क्षेत्रात उत्तुंग उंची गाठणाऱ्या आपल्या माता भगिनी असतात.या माता भगिनींचा सन्मान म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने नऊ दिवस ,नऊ कर्तृत्ववान महिलांच्या प्रती आदर म्हणून प्रत्येक दिवशी एक माळ अर्पण करण्यात आली.
आठव असामान्य व्यक्तिमत्त्वाचा, जागर महिला शक्तीचा यथोचित शब्द रूप सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रत्येक दिवशी समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाची यशोगाथा सांगण्यात आली. पहिल्या माळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विषयी विद्यार्थी पराग कापडणीस व शिक्षिका विद्या पाटील, दुसऱ्या माळेला सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांच्या विषयी गौरव पवार व शिक्षिका मीना धनगर, तिसऱ्या माळेला आशा भोसले यांच्या विषयी विद्यार्थी उमंग बिरारी शिक्षिका शारदा उंबरकर, चौथ्या माळेला स्मिता पाटील यांच्या विषयी विद्यार्थिनी गार्गी पाटील शिक्षिका मनीषा वैद्य, पाचव्या माळेला पी व्ही सिंधू यांच्या विषयी विद्यार्थिनी वैष्णवी पाटील शिक्षिका एस वाय वंजारी यांनी, सहाव्या माळेला मेधा पाटकर यांचे विषयी विद्यार्थी सुमित पाटील शिक्षक डी ए धनगर तर सातव्या माळेला सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी विद्यार्थी देवांग गोहिल, शिक्षक संदीप घोरपडे यांनी त्यांच्या यशस्वी जीवनाबद्दल सांगोपांग माहिती दिली.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंत पाटील, भास्कर बोरसे , अशोक बाविस्कर, सचिव संदीप घोरपडे, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी व सर्व संचालक मंडळ हजर होते. प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाला बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निमंत्रित करण्यात आलेले होते व ते व्यासपीठावर हजर होते. कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन शिक्षक देवेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील पाटील मुख्याध्यापिका अनिता बोरसे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.