पिंपळे रोडवरील गळफास घेऊन एकाची आत्महत्या
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
पिंपळे रोडवरील विठ्ठलनगर भागातील विरभान पुंडलिक पाटील यांनी १२ रोजी पहाटे साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगल ला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
घटनेचे वृत्त कळताच रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मिलिंद सोनार व इतर पोलिसांनी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना खाली उतरवून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा मुलगी असा परिवार आहे.