पा डळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, अन्यथा आंदोलन प्रा. अशोक पवार
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी पा डळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, अन्यथा आंदोलन
प्रा. अशोक पवार
पाडळसे धरणात पाणी साठविण्याचा प्रयत्न सोडून पैसे नसताना , पुनर्वसन अपूर्ण असताना 1010 कोटीची उपसा जलसिंचन योजना करणे म्हणजे कमिशन साठी केलेली ही धडपड असू शकते. धरण पूर्ण होण्याआधी 2013 मध्ये सुमारे पन्नास कोटीचे गेट बनवून ठेवले हे पण कमिशन साठीच. ही कृती म्हणजे लग्न होण्याआधी बाळाच्या कपड्यांची खरेदी करण्यासारखा हा प्रकार आहे. मंत्री अनिल पाटील यांनी 2019 च्या वचननाम्यात दिलेले पाडळसे धरणा संबंधातले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. निधी आवश्यक व महत्त्वाच्या कामासाठी खर्च करावा ही जनतेची अपेक्षा असते. पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करावा अन्यथा दिल्ली येथे आंदोलन केले जाईल असा इशारा प्रा अशोक पवार अध्यक्ष, नागरी हित दक्षता समिती अमळनेर यांनी केंद्रीय जल मंत्री मा .ना. सी. आर .पाटील यांना पत्राने दिला आहे.
पाडळसे धरण 1997 ला सुरू झाले, त्यावेळी फक्त 142 कोटी प्रकल्पाची किंमत होती, ती आज 4890 कोटी रुपये झाली आहे. 26 वर्षांत या प्रकल्पाचे कामावर मार्च 2024 पर्यंत सुमारे 874 कोटी रुपये खर्च झाले अजून 4055 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची किंमत 28 88 .48 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा सहा तालुक्यातील 25692 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तरी पाडळसे धरण प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत समावेश करावा, अन्यथा नागरिक हित दक्षता समिती, अमळनेर दिल्ली येथे आंदोलन करेल असे प्रा. अशोक पवार यांनी पत्रकात म्हटले आहे पत्राच्या प्रती खासदार स्मिता वाघ व सचिव, जलशक्ती मंत्री,नई दिल्ली यांना दिल्या आहे