मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

0

,अमळनेर Express news

अमळनेर( प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात ससंस्थेतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे जनसेवक आमदार मा.श्री. संजय केळकर हे होते.या कार्यक्रमाविषयी मा.आ. जनसेवक संजय केळकर साहेब यांनी मराठी साहित्य मंडळ नवोदित कवींना, दुर्लक्षित कवी, नवोदित लेखकांना प्रकाश झोतात आणते आणि हे काम आजच्या जगात कोणी करायला तयार नाही ते काम मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट आणि त्यांची सर्व टीम करते याचा मला मनापासून आनंद आहे. डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या माध्यमातून ठाणे शहराला एक साहित्याची नवी ओळख निर्माण झाली आहे आणि राज्यभरातून इतर राज्यातून कवी, लेखक ,साहित्यिक ठाण्यात आपली उपस्थिती देतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .मराठी साहित्य मंडळाला आमच्याकडून, प्रशासनाकडून मदत केव्हाही लागली तर देण्याचा मी तयार आहोत असे आश्वासन देतो असे नमूद केले .कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळ चे प्रणेते मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांनी विचार मांडताना विचार मंचावर उपस्थित जेष्ठ कवी नवोदित कवी लेखक यांचा मनापासून कौतुक केले आणि मराठी साहित्य मंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन दिले मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून विविध पुरस्कार सोहळे आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला आणि यात खेड्या पाड्यातील ग्रामीण भागातील दुर्लक्षित कवी ,लेखकांना कसा वाव दिला जातो याविषयी प्रकाशझोत टाकला काव्यस्मंमेलनात 31 कवी कवयित्रींनी सहभाग घेतला त्यात पाच बक्षीस वितरित करण्यात आली .त्यानंतर जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवश्री बापूराव पाटील (ठाकरे सर) धुळे जिल्हा अध्यक्ष सौ सुनंदा निकम ,मुख्य अतिथी म्हणून आलेले ज्येष्ठ कवी लेखक सुरेश लोहार ,कवी संमेलनाच्या अध्यक्षा मा.निलाताई वाघमारे यांनी आपले विशेष असे मनोगत व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय सौ ललिता गवांदे नाशिक ज्येष्ठ कवी विनायकराव जाधव कराड प्रमुख पाहुणे मा सिद्धार्थ कुलकर्णी महानगर मुंबई प्रदेश अध्यक्ष, आणि सौ सुनंदा निकम धुळे जिल्हा अध्यक्ष , शिवश्री बापूराव पाटील ठाकरे सर जिल्हाध्यक्ष जळगाव हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक ) यांनी केले नंतर स्वागत गीत भिवंडी येथील निकिता पाटील यांनी म्हटले तसेच कार्यक्रमाचे दिलखुलास सूत्रसंचालन भिवंडी तालुका अध्यक्षा ,निवेदक,मा. सचिन पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास जेष्ठ साहित्यीक, नवोदित कवी बहुसंख्येने उपस्थित होते.ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेंद्र कवडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

 


याच कार्यक्रमात ज्येष्ठ गजलकार नीलाताई वाघमारे याना सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्री बाई फुले जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर नाशिक येथील जी के गोपाळ याना त्यांच्या सामाजिक कार्याचे योगदान लक्षात घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन तसेच वाशी नवी मुंबई येठी डॉ अजित मगदूम याना साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे विशेष होय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!