राजमुद्रा फाउंडेशन च्या वतीने अनोखा उपक्रम
अमळनेर Express news दिवाळीची सुरुवात बळीराजाला घास भरवून…!
यावर्षी संपूर्ण अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून या शेतकरी बळीराजाला आधार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा संकल्प करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी ” दिवाळीची सुरुवात बळीराजाला घास भरवून ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महात्मा बळीराजा व नांगराची पूजा करत मांडळ येथील शेतकरी दांपत्य मा.दिनेश पाटील व सौ.प्रतीक्षा पाटील यांचा साडी व टोपी रुमाल देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात प्रा.लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजा विषयी माहिती दिली महाविकास आघाडीचे उमेदवार अनिलजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार श्याम पाटील यांनी व्यक्त केले
कार्यक्रमास डॉ.अनिल शिंदे , नानासाहेब सूर्यवंशी , विजय चव्हाण , दयाराम पाटील , गुणवंत पवार , वाल्मीक मराठे , श्रीकांत चिखलोदकर सर्व पत्रकार बांधव, सुधीर पाटील यांच्यासह असंख्य महिला , युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते…!