साळवे इंग्रजी विद्यालय व जि प प्राथमिक विद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती प्रभात फेरी*
अमळनेर Express news
अमळनेर
प्रतिनिधी- सुधाकर मोरे धरणगाव जि. जळगाव.
साळवे गावात दिनांक 30/10/2024 रोजी साळवे इंग्रजी विद्यालय साळवे व जि प प्राथमीक शाळेच्या संयुक्त विद्यमानाने गावात मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात आली . त्यावेळेस मतदारांना संकल्प पत्र वाटून मतदान करण्याचे आव्हान केले. तसेच वोटर हेल्पलाइन ॲप बद्दल साळवे विद्यालयातील (बीएलओ) सुधाकर मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस डी मोरे तसेच जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाणसर, चेतना बि-हाडे यांनी मार्गदर्शन केले. या कामी शिक्षिका निता पाटील, प्रतिभा पाटील, पोर्णिमा वारके, वर्षा नेहेते, गुणवंती पाटील, शिक्षक व्ही के मोरे, एस पी तायडे, बी आर बोरोले, एस व्ही राठोड, व्ही एस कायंदे, ए वाय शिंगाणे, वसंत कुसुंबे, सुरेंद्र सोनवणे, अंगणवाडी सेविका सुनंदा चव्हाण, मंगला नेमाडे, अनिता मोरे, आशा पाटील, सुरेखा अहिरे, आरोग्यसेविका निराशा माळी, पोलीस पाटील निसार पटेल, कोतवाल आशिष कोल्हे, यांनी परिश्रम घेतले. गावातील विद्यार्थी व बहुसंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला.