मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात लेखक – विद्यार्थी वाचन संवादाचे आयोजन*.—

0

अमळनेर  Express news
मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “वाचन-संकल्प महाराष्ट्राचा ” आणि “वाचन पंधरवाडा” या निमित्ताने महाविद्यालयात ‘ लेखक-विद्यार्थी वाचन संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले,यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले अध्यक्ष होते. अध्यक्ष मनोगतात दि. 1 जानेवारी 2025 ते दि.15 जानेवारी 2025 वाचन पंधरवाडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे, महाविद्यालयाने या कालावधीत दरम्यान ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन , वाचन कौशल्य कार्यशाळा, लेखक- विद्यार्थी वाचन संवाद अशी विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. वर्तमानपत्रे ,मासिके,ग्रंथ वाचण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारची कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संजय महाजन( हिंदी विभागप्रमुख) होते. कथा, कादंबऱ्या, नाटक अनेक विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध आहे तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात असलेली पुस्तके वाचावीत त्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडेल तसेच नेहमी मासिके ,वृत्तपत्रे ही वाचावीत. दररोज पंधरा मिनिटे पुस्तक वाचन करावे.असं मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे आभार नाजमीन पठाण हिने मानले, ग्रंथपाल विजय पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय-विभागातर्फे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि शिक्षककेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!