क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले. श्रीमती आशा महाजन
अमळनेर Express news
क्रांतीज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी ,उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका ,आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी , चौकस व्यवस्थापक, कवयित्री, धुरंदर सत्यशोधक ,ज्वलंत समाजसेविका अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी *जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले *.असे उदगार युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वक्त्या श्रीमती आशा महाजन यांनी काढले त्या सार्वजनिक विद्यालय सारबेटे येथे सावित्रीबाई जयंती निमित्त बोलत होत्या.
युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवा निमित्त 101 ठिकाणी व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित केले होते ,त्यात अमळनेर ,चोपडा ,पारोळा तालुक्याचा समावेश होता. प्रा. डॉ राहुल निकम यांनी चोपड्यातील आदिवासी भागात विविध शाळांमध्ये व्याख्यानांचे आयोजन केले होते तर पारोळा तालुक्यात रामेश्वर भदाणे व गिरीश पाटील यांनी कार्यक्रमांची जबाबदारी घेतली होती, चार महिन्याचे बाळ घरी ठेवून प्रज्ञा शिरूडकर यांनी अमळनेर येथे इंदिरा गांधी शाळेत भाषण दिले तर अमळनेर तालुक्यात पिंपळी येथे सर्वात मोठ्या सावित्री उत्सवाला संदीप घोरपडे व अशोक बि ऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले .भाविका वाल्हे या विद्यार्थिनीने अति उत्कृष्ट सादरीकरण केले . ज्ञानज्योती सावित्रीबाई उत्सवात सुमारे 95 विद्यार्थी वक्त्यांनी भाषणाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला तर युवा कल्याण प्रतिष्ठानचे 101 वक्ते विविध शाळांमध्ये व्याख्यानासाठी गेले होते.
या अभियानाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचे जीवन कार्य व कर्तृत्व सुमारे बावीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील व सर्व विद्यार्थ्यांनी युवा कल्याण प्रतिष्ठानच्या *महापुरुषांच्या विचारांचा प्रचार *या अभियानात सहभागी होण्याचा निर्णय प्रा अशोक पवार यांचे उपस्थितीत जाहीर केला. अभियानात सुमारे 15 महिला वक्त्यांचा समावेश होता . वक्त्यांची कार्यशाळा व वाचन साहित्याचे वाटप ही या अभियानाची खास वैशिष्ट्ये आहेत .प्राथमिक शिक्षिका आशा महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाविषयी तयार केलेले वाचन साहित्य सर्व शाळांना देण्यात आले.
अभियानाच्या वक्त्यान मध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय शिक्षकांचा व सेवानिवृत्तांचाही वक्त्यांमध्ये समावेश होता.
हे अभियान माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने राबविले जाते .खर्च अत्यंत अल्प येतो. पाच वर्षात अमळनेर तालुक्यात एक हजार वक्ते तयार करण्याचा संकल्प युवा कल्याण प्रतिष्ठानने जाहीर केला आहे .वाचन संस्कृती व सादरीकरण कौशल्य वाढावे हा या अभियानाचा उद्देश आहे. घर घर संविधान या विषयावर एकाच दिवशी 500 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प अभियानाचे प्रमुख प्रा. अशोक पवार यांनी याप्रसंगी जाहीर केले.