पत्रकारदिनी शेकडो गरजूंनी घेतला मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ

0

अमळनेर Express news

मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि गोदावरी मेडिकल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि गोदावरी मेडिकल फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ रोजी सकाळी १० वाजता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या शिबिरात शेकडो गरजूंची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वाणी मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन पालिकेच्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (आयएएस), जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील- घोडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, पालिकेचे बांधकाम अभियंता डिगंबर वाघ, व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सुर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, साप्ताहिक विंग चे तालुकाध्यक्ष अजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. प्रजोत कदम, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उमेश अब्दुलवाड आणि डॉ. वेदांत पाटील यांच्यासह टीमने शेकडो गरजूंच्या २डी इको, इसिजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तसेच इतर तपासण्या मोफत केल्या. पैकी काही रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी बुधवारी, ८ रोजी गोदावरी मेडिकल फाउंडेशन, जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान शहरातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, आर. टी. पाटील, आनंद महाले, भरत पाटील, पुषंद ढाके, मनोहर तायडे, बाळा पवार, भूषण पाटील यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव ईश्वर महाजन, उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, प्रसिद्धी प्रमुख दिनेश पालवे, जयंत वानखेडे, सल्लागार विवेक अहिरराव, उमेश धनराळे, धनंजय सोनार, बापूराव ठाकरे, राहुल पाटील, रजनीकांत पाटील, रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, भाऊसाहेब देशमुख, दिनेश नाईक, शरद कुलकर्णी, किरण चव्हाण, दयाराम पाटील, प्रकाश जैन, बी. एल. पाटील, प्रसाद जोशी, संजय पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत निकुंभ, भूषण महाले, पंकज पाटील आदींनी सहकार्य केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी प्रास्ताविक केले. किरण चव्हाण व अजय भामरे यांनी महाराष्ट्र गीत गायले.
सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांनी तर आभार व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सुर्यवंशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!