मांदुर्णे गावात बळीपाडवा निमित्त महात्मा बळीराजा यांना वंदन !…
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
कृषी संस्कृतीचे महान राजा महात्मा बळीराजा – प्रमोद पाटील [ जळगांव जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ]
चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावात ग्रामपंचायत व सत्यशोधक समाज संघ यांच्या वतीने कृषी संस्कृतीचे महान राजे लोककल्याणकारी राजा – महात्मा बळीराजा यांना वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच गोरख आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते रंगराव पांडुरंग पाटील, धर्मराज पुंडलिक पाटील, जिभाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुभाष पाटील, हरून मन्सुरी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
मांदुर्णे गावाचे सुपुत्र तसेच सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी लोककल्याणकारी महात्मा बळीराजा यांचा जीवनपट उलगडून सांगितला. महात्मा बळीराजांचा वारसा कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांनी चालवला आणि आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी बळीराजाचा इतिहास आपल्या गुलामगिरी ग्रंथातून सांगितला या सोबतच प्राच्यविद्यापंडित आ.ह.साळुंखे यांच्या बळीवंश मधील खरा इतिहास उपस्थितांना सांगितला. आज देखील आपली माय – माऊली दिवाळीच्या बळीपाडव्याला म्हणते ” इडा पिडा टळो बळीराजाचे राज्य येवो ” म्हणजेच बळीराजाचे राज्य इतके चांगले होते की, प्रजादेखील त्या काळामध्ये अत्यंत समाधानी व सुखी होती असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
अशा या महान राजाला वंदन करण्यासाठी मांदुर्णे गावातील ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद रघुनाथ शंकर महाजन, दिपक बळीराम महाजन, साहेबराव भिमराव खैरे, भगवान भिकारी माळी, भानुदास दौलत गायकवाड, नितीन रामकृष्ण खैरे, अमन हारून पिंजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.