15 अमळनेर विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत?
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री व महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रा अशोक पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आव्हान दिले आहे त्यामुळे मुख्य लढत चौरंगी होईल असे चित्र दिसते.
308272 मतदार अमळनेर विधानसभा मतदारसंघात आहेत. अंदाजे दोन लाख मतदान होईल असे धरले तर निवडून येणाऱ्या उमेदवाराला सुमारे 70 ते 75 हजाराचा आकडा गाठावा लागेल .या मतदारसंघात व्यावसायिक उमेदवार नको कार्यकर्ता हवा. अशी मानसिकता झाली आहे. विकास करणाऱ्यांना पैसे वाटण्याची भाषा शोभत नाही अशीही चर्चा जन माणसात आहे.
रोखठोक बोलणारे अपक्ष उमेदवार प्रा.अशोक पवार यांची दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी अमळनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रचंड दणदणीत पहिली जाहीर सभा आयोजित केल्याने ,सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्व नागरिक मतदार बंधू-भगिनींना विनंती की, लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे तसे आवाहन अमळनेर एक्सप्रेस ने केले आहे.