आनोरे येथे बचत गटामार्फत* *सत्कार समारंभ संपन्न*
अमळनेर Express news अमळनेर प्रतिनिधी
“””””‘””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
🎉🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🎉
*आनोरे गावातील प्रतिष्ठित नागरिक व विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सेक्रेटरी म्हणून तीस वर्षे सेवा बजावणारे तसेच श्री गणेश स्वयंसहाय्यता बचत गट अनोरे व सहयोग स्वयंसहायता बचत गट अनोरे या दोन्ही बचत गटांचे कार्यभार 25 वर्षापासून काही मूल्य न घेता आपल्या कामाचे प्रामाणिकपणे सभासदांना न्याय देणारे गटाचे सचिव आदरणीय श्री शालिक विठोबा पाटील उर्फ बापू यांचा सत्कार गटाचे अध्यक्ष आबासाहेब श्री मधुकर नामदेव देशमुख व ज्येष्ठ सभासद काकासो श्री जगन्नाथ नामदेव महाजन यांच्या शुभहस्ते दिनांक* 4 /11/ 2024 वार
*सोमवार या दिवशी श्री जगन्नाथ नामदेव महाजन यांच्या मळ्यात करण्यात आला*.
*या कार्यक्रम प्रसंगी सहयोग स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष आदरणीय श्री आबासो मधुकर नामदेव देशमुख यांनी गटाची निर्मिती केव्हा झाली याविषयी माहिती दिली तर बापूंनी केलेल्या कामाचे मूल्य आपण करू शकत नाही,तसेच आपल्या आर्थिक गरजा गटामार्फत बापूनी वेळेवर पुर्ण केल्या असे मत व्यक्त केले*.
कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही गटाचे बहुसंख्य सभासद उपस्थित असून स्नेह भोजनाचाही आस्वाद घेतला.
*या कार्यक्रमाचे श्री गणेश स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष अण्णासो श्री एम. एच.चौधरी सर यांनी मानवी जीवनात बचतीचे महत्त्व व बचत गटाने सामाजिक दायित्व पूर्ण करून वेळोवेळी सभासदांना आर्थिक मदत केली याची माहिती दिली.तर श्री आर.बी.महाले सर यांनी आभार व्यक्त केले*.
🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧