व्हॉईस ऑफ मीडिया आयोजीत ‘मंगल सुर’ गीत -संगीत -लावणी – मिमिक्री कार्यक्रमाने भरला रंग
अमळनेर Express news
रसिकांची भरभरून दाद : कलावंतांचा झाला भावनिक सत्कार
अमळनेर – गीत- संगीत -लावणी व कॉमेडीची धडाकेबाज आणि ठसकेबाज आतिषबाजीचा जोरदार कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पाडला मंगल सुर हा मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला कलावंतांचा वाद्य वृंद, मराठी- हिंदी चित्रपटातील सदाबहार जुन्या -नव्या गाण्यांची चिरस्मरणीय पेशकश सोबत पारंपारिक घायाळ अदाकारीचे लावणी नृत्यांचे फडकते नजराणे , लंडन, पॅरिस ,म्युनिक व अमेरिकेतील २२ शहरांत २५ प्रयोग करून गाजलेला व महाराष्ट्राने गौरवलेला ‘झी मराठीचा पहिला हास्य सम्राट हास्यकल्लोळ कॉमेडी स्टार प्रा. दीपक देशपांडे यांची मिमिक्री सादरीकरण झाले . व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के-पाटील ,राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, तसेच अमळनेर शहरातील गायक, संगीतकार, नर्तक, नाट्य कलावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या सर्व उद्घाटक कलावंतावर पुष्पवृष्टी करून अत्यंत भावनिक सत्कार करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सत्काराने कलावंत भारावले. यावेळी पप्पूज आईस्क्रीमचे भूपेंद्र जैन , महावीर आईस्क्रीमचे प्रकाश जैन , खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरि भिका वाणी , योगेश मुंदडे , नीरज अग्रवाल , मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओमप्रकाश मुंदडा व अमेय मुंदडा , मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी ,नाट्यगृहाचे संचालक हेमकांत पाटील या दात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक डॉ रविंद्र चौधरी, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोतमा पाटील, विजय माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे दिव्या भोसले यांनी सर्व उपस्थितांना निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदान करण्या संदर्भातील शपथ दिली.
दरम्यान घुंगरांच्या तालावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत…गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडाटात, ढोलकीच्या तालावर अनेक प्रेक्षकांची पाऊले आपसूकच थिरकली. एकापेक्षा एक बहारदार लावण्या सादर झाल्या. जुन्या, नव्या बाजाच्या लावण्या व सिनेगीते यानिमीत्त रसिकांना बघायला व ऐकायला मिळाल्या. शहरातील कला क्षेत्रातील अनेक दिग्गज नामवंत तसेच रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली होती. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच सर्व तिकिटे विक्री होवून शो हाऊसफूल झाला होता.
अनिल म्हस्के -पाटील , दिव्या भोसले यांनी मनोगते व्यक्त केली . व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब देशमुख यांनी आभार मानले.
*या कलावंतांचा होता सहभाग*
मंगल सूर या कार्यक्रमात ढोलकी वादक निशा मोकल, कीबोर्ड मनोज शिवलिंग, रुपेश पाटील, ड्रम भक्ती कापडिया, प्रेषिता मोरे, ऑक्टोपॅड प्रिया वाजे, ढोलकी देवाशिष पाटील, गायक सपना हेमन, विजय धुरी, पंकज गामरे, अँकर हेमलता तिवारी, डांसर भूमिका भोसले आणि अंबिका पुजारी आदींनी उत्कृष्ट सादरीकरण केले.