श्री मंगळग्रह मंदिरात हळदीचा कार्यक्रम उत्साहात
अमळनेर Express news
अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त आयोजित श्री तुलसी विवाह महासोहळ्याच्या पूर्वसंध्येला १४ रोजी संध्याकाळी
मंगळ ग्रह मंदिरात हळदी व संगीतसंध्या कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी स्वाती महाले, विशाखा चौधरी, स्वाती चौधरी, योगिता साबळे, प्रियंका पवार यांनी श्री विष्णूजी आणि श्री तुलसी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीला हळद लावली. प्रसाद भंडारी, जयंतराव वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, शुभम वैष्णव, मंदार कुलकर्णी, वैभव लोकांक्षी यांनी पौरोहित्य केले.
दरम्यान उपस्थित महिलांनी पारंपरिक नृत्यकलेसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांना मुंबई येथील निशा मोकल यांच्या फिमेल ऑर्केस्ट्राची साथ लाभली. यावेळी शहरातील विविध महिला मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकारी तसेच सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.