आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील

0

अमळनेर Express news

भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे उपस्थित होते. शाळेतील जेष्ठ शिक्षिका एम के कापडणे एम बी मोरे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेतील उपक्रमशील शिक्षक ग्रंथप्रेमी पी डी पाटील यांनी “भारतीय संविधानाची तोंडओळख “हा अनमोल ग्रंथ शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिला.
व्ही टी माळी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व इतिहास विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितलं यासोबतच आपले मूलभूत अधिकार, कर्तव्य याचे देखील महत्त्व सांगितले. बाबासाहेबांनी देशाला संविधान देऊन समस्त मानव जातीचे हात बळकट केलेले आहेत. सर्व भारतीयांनी संविधानाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!