देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक.. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिन साजरा करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक समरसतेत ज्यांनी संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी केली त्या दाम्पत्याच्या समर्पणाला नजरेआड करणाऱ्या शासन व्यवस्थेला आदर्श उदाहरण यानिमित्ताने महात्मा जोतीराव फुले हायस्कूलने घालून दिला. गेल्या 22 वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 28 नोव्हेंबर हा महात्मा फुले स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत आहोत..
इयत्ता दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत भूमिका साकारत दिवसभर शाळेत अध्यापनाचे कार्य केले.
अगोदर क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस के महाजन, अरविंद सोनटक्के व विद्यार्थी मुख्याध्यापक रागिणी पाटील सह विद्यार्थी शिक्षक वृद यांनी केले.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी रागिणी पाटील हिने मुख्याध्यापकाची भूमिका साकारली, शिक्षक म्हणून सोनाली महाजन, उन्नती गायकवाड ,मयुरी महाजन, हर्षल पाटील ,पवन पाटील, रूपाली पाटील, प्रियंका पाटील, कीर्ती मोरे यांनी शिक्षकाची भूमिका करीत अध्यापनाचे कार्य केले. तर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून राज जाधव यांनी भूमिका साकारली..
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.नंतर कार्यक्रमात विद्यार्थी मुख्याध्यापक रागिणी पाटील व विद्यार्थी शिक्षक मयुरी महाजन,सोनाली महाजन,
शिक्षकांनी दिवसभर आलेले अनुभव कथन केले.
अध्यक्षीय भाषणात अनिल महाजन यांनी सांगितले की दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर उत्कृष्ट अध्यापनाचे काम केले.
महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे गुण आत्मसात करा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी उन्नती गायकवाड हिने केले तर आभार प्रदर्शन पवन पाटील यांनी मानले.
शेवटी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी मुख्याध्यापिका रागिनी पाटील सह सर्व शिक्षक वृंदांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी सत्कार केला..