रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स तर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त अमळनेरात पालखी नाटकाचे आयोजन
अमळनेर Express news
पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्ताने वारी निघते. या वारीची थोर परंपरा अमळनेरला संत सखाराम महाराज यांच्या पायी वारीने शेकडो वर्षापासून जपून ठेवली आहे. असाच एक आध्यात्मिक अनुभव दिनांक ८ डिसेंबर रविवारी सायंकाळी ७ वाजता अमळनेरकरांना अनुभवायला मिळणार आहे. जळगाव येथील प्रसिद्ध सराफी सुवर्ण पेढी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स या फर्मला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी उत्सव साजरा केला जात आहे. रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स म्हणजे उत्कृष्ट गुणवत्ता, पारंपरिक व आधुनिकतेचा सुंदर मिलाफ आहे. “जहां विश्वास ही परंपरा है,” या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांच्या सर्व व्यवहारात पारदर्शकता आहे. या सुवर्ण महोत्सवी उत्सवाच्या निमित्ताने रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स तर्फे अमळनेरकर रसिकांसाठी “पालखी” या दोन अंकी नाटकाचे आयोजन नगरपालिकेच्या छ. शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध लेखक दि.बा. मोकाशी यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शंभू पाटील यांनी केलेले आहे. परिवर्तनच्या ४५ कसलेल्या कलावंतांच्या संचात हे नाटक सादर केले जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारीचे विविधरंगी दर्शन प्रत्यक्ष रंगमंचावर पहायला मिळणार आहे. नाम घोषात आणि टाळ मृदुंगाच्या साक्षीने निघालेली वारी रसिकांना भक्तिभावात भिजवून टाकेल.
जळगावच्या परिवर्तन संस्थेने गेल्या काही वर्षात जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी दर्जेदार कार्यक्रम सादर करून आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.परिवर्तन म्हटले म्हणजे दर्जेदार कार्यक्रमाची हमी हे आता सर्वमान्य झाले आहे. असाच अनुभव परिवर्तनच्या “पालखी” या नाटकातून अमळनेरकरांना रविवारी अनुभवायला मिळणार आहे.या नाटकासाठी रसिक प्रेक्षकांना गुगल फॉर्मच्या माध्यमातून नाव नोंदणी करून प्रवेशिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम जवळपास हाउसफुल झाला आहे. काही मोजक्या प्रवेशिका शिल्लक असून प्रवेशिका साने गुरुजी ग्रंथालय व फोर्टस, ढेकू रोड याठिकाणी रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.