लोंढवे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
लोंढवे येथिल m p s c या स्पर्धा परिक्षेत चार युवक उत्तीर्ण झाल्याने सैन्य दलात अग्नीवीर म्हणून तीन युवकांची निवड झाल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत लोंढवे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला . MPSC परीक्षेत अक्षय रमेश पाटील प्रभाकर उदा खैरनार हे सहाय्यक अभियंता म्हणून जि प जळगांव अंतर्गत अमळनेर पंचायत समिती येथे नेमणूक झाली आहे . आरोग्य विभागात प्रविण शांताराम पाटील आकाश पांडूरंग भागवत यांची निवड झाली तसेच सैन्य दलात अग्नीवीर म्हणून कुंदन बाळू पाटील दिनेश भगवान पाटील मनोज राजेंद्र पाटील यांच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच भारती पाटील ह्या होत्या प्रास्ताविक बन्सीलाल भागवत निवृत्त केंद्रप्रमुख यांनी केली . बाळासाहेब पाटील माजी उपसभापती पं स अमळनेर यांनी सर्वांचा सत्कार केला . याप्रसंगी बन्सीलाल भागवत बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले . या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील उपसरपंच चतुर पाटील ग्राम पंचायत सदस्या अचलबाई भागवत मोनाली पाटील दिलीप पाटील ज्ञानेश्वर पवार मालुबाई पाटील मिनाबाई पाटील मालती खैरनार नारायण पवार निळकंठ पाटील निवृत मुख्याध्यापक देविदास माळी ग्रामसेवक मुरलीधर पवार अर्जून भागवत दिपक पाटील रमेश पाटील ग्रामसेवक सर्व ग्रामस्थ ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते