शिक्षण परिवर्तनाचे साधन, राष्ट्र उभारणीत शिक्षकाचा मोलाचा वाटा* –डॉ भावना भोसले.

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनीधी

*समस्या पाहून ज्यालास्फुरण चढते तो खरा बुद्धिमान* –एस एस पाटील

धरणगाव प्रतिनिधी:-

मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले ह्या ०0होत्या. त्यांनी आज धरणगाव तालुक्यातील
माध्यमिक मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवॉर्ड रजिस्ट्रेशन करणे ,विज्ञान प्रदर्शन पूर्वतयारी करणे, निवडणूक साक्षरता मंच स्थापन करणे, मतदान जाणीव जागृती अंतर्गत शाळा स्तरावर विविध स्पर्धा घेणे, महावाचन चळवळ उपक्रम, NMMS, NSP Portal, संकलित चाचणी १ पूर्वतयारी, नवोदय परीक्षेचे आवेदन पत्र भरणे, सेवा हमी कायदा, शासकीय योजनांचा जागर, नवभारत साक्षरता अभियान, माहिती अधिकार दिन साजरा करणे, स्वच्छता पंधरवाडा राबविणे,
सखी-सावित्री समिती, तक्रार पेटी तक्रार निवारण समिती, सुरक्षा विषयक समिती, cctv Camera आढावा, पोषण माह साजरा करणे, शालेय पोषण योजना, TRGM data, नोंदवही अद्यावत करणे, परसबाग विकसित करणे, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना, युडायस, सरल पोर्टलवर नोंदणी, अपार नोंदणी, संचमान्यता, mooc प्रशिक्षण, nsqf, विद्यांजली पोर्टल, स्वच्छता monitor, क्रिडा स्पर्धा, शालेय स्पर्धा, लोकसहभाग ,शालेय अभिलेखे, गुणवत्ता रेकॉर्ड, आचार संहिता पालन करणे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजय पाटील, सचिव डि एस पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एस एस पाटील, तालुकाध्यक्ष जे के पाटील, साधना लोखंडे, वाय पी पाटील, एम एच चौधरी, रवींद्र चव्हाण, संजय पाटील आदी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे जिल्हाउपाध्यक्ष एस एस पाटील यांनी सांगितले की, शिक्षकांच्या जवळ इच्छा, प्रयत्न व सहकार्य असले की विद्यार्थ्यांची प्रगती होते. आपण देवाचे आभार मानले पाहिजे. छान व्यवसाय, चांगले कार्य, पिढी बदलवण्याचे काम आपल्या हातात आहे. ते आपण निरपेक्षपणे केले पाहिजे. एम एच चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे सुप्त शक्ती जागृत करावी, शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. असे सांगितले. संजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी टेक्नोसेवी शिक्षक नवनीत सपकाळे यांनी इन्स्पायर अवार्ड नोंदणी व प्रयोगांविषयी सविस्तर माहिती दिली. या पसंगी ध

 

रणगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक काही क्लर्क आणि पथराड हायस्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन त्रिभुवन मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन जे के पाटील यांनी केले.त्यानी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तालुक्यातील गुणवत्ता समिती करून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेप्रमाणे नियोजन करावे व त्या शाळांना बक्षीस द्यावे असे सांगितले. उत्कृष्ट असं सुरुची भोजन देऊन कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!