धरणगाव शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
——————————————— दि.१ आॅक्टोबर रोजी धरणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदानावर १४/१७/१९ वर्षे वयोगटाच्या मैदानी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धचे उद्घाटन पी आर हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.श्री. अरुणजी कुलकर्णी सर सचीव डॉ.श्री.मिलिंदजी डहाळे सर प्राचार्य डॉ.श्री.उदयजी जगताप सर पर्यवेक्षक श्री.डी.डी.पाटील सर यांच्या उपस्थितीत कॅल्पर वाजवून उद्घाटन करण्यात आले डॉ .
अरुण कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांना मैदानी खेळांविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले या मैदानी स्पर्धांमध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदवला पंच म्हणून श्री.डी.एन.पाटील के.एस.पाटिल आर बी. महाले डी. एच.कोळी फिलिप्स गावित पवन बारी राजेश पावरा हेमंत माळी ऐ.जे.जयकारे वाय.ऐ.पाटिल नरेश पाटील सागर मणियार कायेंद सर भूषण बोरवले सर ए.एम.सैय्यद रोहित सपकाळे राकेश पवार सर आबा महाजन सर व साक्षी माळी मॅडम निथलेश चौधरी सतिश पाटील नितीन पाटील यांनी काम पाहिले तर समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन श्री आर बी महाले सर यांनी केले आभार क्रीडा शिक्षक श्री एच.डी.कोळीसर यांनी मानले स्पर्धा पार पाडण्यासाठी सिनीयर काॅलेजचे फीजिकल डायरेक्टर दिपक पाटील सर व जितेंद्र ओस्तवाल सर यांनी अथक परिश्रम घेतले तर वाद्यांर्थी सेनेने सर्व खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या सर्व विजयी स्पर्धकांना जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या