साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष डी.एम पाटील सर सरपंच पती वकील बाबा, उपसरपंच गोपाल भाऊ पाटील, ग्रा.प. सदस्य, नवल पाटील, प्रकाश वाल्हे, सुनिल पाटील, विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते राकेश कृष्णा पाटील,अनिल पाटील, ग्रंथपाल विजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष डी एम पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या महान कार्याचा आढावा घेत हा देश गांधींचा व लालबहादूर शास्त्रींचा आहे आम्हाला परदेशात जाताना आम्ही गांधींच्या देशातून आलो आहोत हे सांगावे लागते इतके महान कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आहे आपले विचार मांडताना स्वातंत्र्याच्या जडणघडणीत महात्मा राष्ट्रपिता व लालबहादूर शास्त्री यांचा मोलाचा वाटा आहे असे मत कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी मांडले