विद्यार्थ्यांच्या मेहनत सराव आणि जिद्दीमुळे यश* –क्रीडाशिक्षक व्हि एस कांयदे.
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
*साळवे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड*
साळवे इंग्रजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी धरणगाव तालुका स्तरीय स्पर्धेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हा पातळीवर मजल मारल्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस डी मोरे व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक, अभिनंदन व शुभेच्छा देऊन सत्कार केला. त्याचबरोबर क्रीडाशिक्षक व्ही एस कायंदे म्हणाले विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे कसून सरावामुळे व जिद्दीमुळे त्यांना यश मिळाले. व बी आर बोरोले यांनी विद्यार्थ्यांच्या सराव करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करणे, अभ्यास, सराव करणे आणि चिकाटी ठेवणे यामुळे माणूस यशस्वी होतो. असे मुख्याध्यापक एस डी मोरे म्हणाले. क्रीडा शिक्षक व शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय आलेला जय गोरख पाटील (इयत्ता दहावी) तीन मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम आलेली हर्षदा संदीप पाटील (इयत्ता नववी) द्वितीय- रोशनी गोपीचंद पाटील (इयत्ता दहावी) व पाचशे मीटर चालण्याच्या स्पर्धेत तालुक्यात दुसरा भरत गुंजन मराठे (ईयत्ता नववी) या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, सचिव डॉ चंद्रकांत नारखेडे, शालेय समितीचे चेअरमन डॉ शशिकांत नारखेडे आणि सर्वांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्या रत्ना पाटील यांनी स्वलिखित पाच ग्रंथ सासर माहेर, माझं काय चुकलं, बँड टच,प्रवास, गोढपादल्या ईत्यादी विद्यालयाला भेट दिले. त्यांचे दिगंबर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे यांनी केले आभार प्रदर्शन एस पी तायडे यांनी केले.