राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – दिलीपराव सोनवणे*
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
शनिवार: दिनांक ५ सप्टेंबर २०२४
समाजाची आदर्श पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षक हाच नवनिर्मितीचा पाया आहे. सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर शिक्षकांशिवाय पर्याय नाही. परंतु आज अनेक प्रश्न शिक्षकांच्या समोर आ वासून उभा आहेत. सत्ताधाऱ्यांना याचा मात्र विसर पडला आहे. आज शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांना जणू जुंपले जात आहे. त्यामुळे त्यांना मुख्य असणाऱ्या अध्यापनाच्या कामाकडे वेळ देणे अवघड झाले आहे. यातून नेमके शासनाला काय साधायचे असा प्रश्न आमच्या समोर पडतो. असे मत नाशिक शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव सोनवणे यांनी व्यक्त केले. दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे शिक्षकांशी आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
जुनी पेन्शन मिळविण्यासाठी आज शिक्षकांना उपोषणाला बसावे लागत आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. टप्पा अनुदानामध्ये आज अनेक शाळा अडकल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये नॉन पिटीशनर लोकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपले जिल्हा परिषदेमधून काम करून घेण्यासाठी चिरीमिरी देण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे. हे सर्व दूर करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल. तुम्ही सर्व साथ द्या. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे मा.आमदार दिलीपराव सोनवणे म्हणाले.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष काकासाहेब देशमुख व प्रदेश प्रवक्ता तथा रयत बँकेचे संचालक प्रशांत खामकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका घेतली. कार्यक्रमास शिक्षक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब गांगर्डे, अहमदनगर जिल्हा सहसचिव संदीप काळे, सिद्धेश्वर गरुड देशमुख, प्रा. खेतमाळीस व रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा.घालमे यांनी मानले.