नवरात्री निमित्त कृष्णगीता नगरात सर्पांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
अन्य प्राणीमात्रांप्रमाने सर्पांनाही पृथ्वीवर राहण्याचा अधिकार; सर्पमित्र राजेंद्र वाघ
सर्पांचे संवर्धन व संरक्षण गरजेचे; सर्पमित्र भरत शिरसाठ
धरणगांव : येथील कृष्ण गीता नगरात नवरात्रोत्सवाचे व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधत सर्पांविषयी जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जनजागृती कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून शहर परिसरातील वन्य जीव संस्थेचे सदस्य तथा स्नेकसेवर आबासाहेब राजेंद्र वाघ, स्नेकसेवर भरत शिरसाठ, निलेश चौधरी, भूषण पाटील, राजेंद्र कुंभार, दिपक महाजन, पंकज मराठे, गणेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी सर्पमित्रांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करण्यात आली. व उपस्थित स्नेकसेवर अतिथींचा शाल व महापुरुषांचे ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर वन्यजीव प्रेमी भरत शिरसाठ यांनी जगभरात, भारतात, महाराष्ट्रात व आपल्या परिसरात असलेल्या विषारी, निमविषारी, व बिनविषारी सर्पाविषयी ओळख दिली. मांत्रिक, खेळ दाखविणारा गारुडी, मदारी कश्या प्रकारे गैरसमज, अंधश्रध्दा पसरवतात याबद्दल देखील श्री. शिरसाट यांनी प्रात्यक्षिक दाखवीले. सर्पदंश कसे टाळावे, सर्पदंश झाल्यास काय करावे, पर्यावरणासाठी सर्पचे महत्व, इत्यंभूत माहिती पोस्टरद्वारे देताना उपस्थितांना आवाहन केले की, आपणा कोणाला सर्प दिसला तर मारू नका, आम्हा सर्पमित्रांना बोलवा, आम्ही त्यांना सुरक्षित पकडू व त्यांचा अधिवासात सोडू असेही शिरसाठ यांनी सांगितले. यांनतर सर्पमित्र आबासाहेब वाघ यांनी सांगितले की, सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. सर्पदंश झाल्यास कोणतेही मंदिर, दर्गा, बुवा, बापू, बाबा, साधू, महाराज यांच्याकडे न जाता उपचारासाठी शासकिय रुग्णालयात जाणे जरुरीचे असते. सर्पविषयी अंधश्रध्दा ठेवू नका. सर्प हा निसर्गाच्या अन्न साखळीतला एक प्रमुख घटक आहे. यांसह सर्पाचे आपल्या जीवनातील महत्व खूप मोठे असल्याचे सांगितले. यानंतर उपस्थित महिला, पुरुष व बाळगोपाळांनी सर्पविषयी विचारलेल्या विविध शंका, प्रश्नांवर विस्तृत मार्गदर्शन सर्पमित्रांनी केले. याप्रसंगी कृष्ण गीता नगरचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, विनायक न्हावी, महेंद्र सैनी यासह सर्व कॉलनीवासी महिला, पुरुष, बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.