राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पुण्यात जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
अमळनेर विधान सभा मतदारसंघासाठी दहा. इच्छुक उमेदवारांच्या आज पुण्यात मुला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या अमळनेर तालुका विधानसभा मतदारसंघासाठी दहा इच्छुक उमेदवार मुलाखतीस हजर होते त्यात तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बी एस पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील शहर अध्यक्ष श्याम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील प्राध्यापक अशोक पवार प्रशांत जी निकम रिताताई बाविस्कर संजय पुनाजी पाटील आणि विशेष विशेष म्हणजे पुनर्वसन मंत्री दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्याच गावातील म्हणजे हिंगोणे गावातील दिव्या मराठे यांनीही उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच कृषी भूषण व माजी आमदार साहेबराव दादा पाटील मात्र आज पुण्यात उमेदवारीच्या मुलाखतीसाठी हजर राहिले नाहीत त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे समजते साहेबराव दादा यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली अशी चर्चा मुलाखतीसाठी गेलेले इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे साहेबराव दादा पाटील एक तुतारी फुंकणार नाहीत नाहीत अशी खळबळ जनक माहिती समोर येत आहे अशी सविस्तर माहिती प्राध्यापक अशोक पवार यांनी दिली आहे