अनोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनीधी
धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील कै बळीराम जीवन महाजन विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने जिल्हा पातळीवर त्यांची निवड झाली आहे.
त्यात कृतिका महाजन ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, ममता सोनवणे २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रांजल पाटील २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, अश्विनी देवरे २०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक, गीतांजली पाटील भालाफेक प्रथम क्रमांक, निलेश पाटील ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रथमेश पाटील १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रथम पाटील १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक यांचा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पुढील आठवड्यात होणाऱ्या जळगाव येथे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी ए के पाटील आर बी महाले बी आर महाजन कल्पेश वारुळे किरण महाजन बाळकृष्ण सुतार प्रकाश माळी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना क्रीडा शिक्षक आरबी महाले यांचे मार्गदर्शन लाभले.