हिंगोणे येथील रामकुवर परिवाराचा क्रांतिकारी निर्णय !….
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
शिंदखेडा येथे प्रथमच सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध (साखरपुडा ) संपन्न !…
प्रतिनिधी –
धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे बुद्रक या गावातील गोकुळ बळीराम पाटील यांचे चिरंजीव सत्यशोधक प्रशांत यांचा शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे महात्मा जोतीराव फुले निर्मित सत्यशोधक समाज संघाच्या सार्वजनिक सत्यधर्मीय विधीनुसार सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम वधू-वरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावातील हिलाल व मुरलीधर बळीराम पाटील यांचे पुतणे व गोकुळ बळीराम पाटील यांचे चिरंजीव सत्यशोधक प्रशांत व शिंदखेडा येथील दयाराम मुकुंदा माळी यांची पुतणी व शंकर मुकुंदा माळी यांची कनिष्ठ कन्या सत्यशोधिका पल्लवी दि. ४ / ११ / २०२४ सोमवार रोजी धुळे येथील सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे यांच्या हस्ते सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध ( साखरपुडा ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या साक्षगंध कार्यक्रमासाठी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे प्रमुख अतिथी होते तसेच शिंदखेडा व धरणगांव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व आप्तेष्ट- नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साक्षगंध सोहळ्याच्या निमित्ताने सत्यशोधक विधीकर्ते राजकिशोर तायडे यांनी सत्यशोधक समाज संघाच्या संदर्भात विस्तृत माहिती सांगून मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात गावोगावी सत्यशोधक पद्धतीने विवाह, साखरपुडा, दशपिंडविधी, गृहप्रवेश व्हावेत असे आवाहन केले. येत्या ३० नोव्हेंबर, व १ डिसेंबर २०२४ ला नायगाव येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर ( अहमदनगर ) पार पडणार आहे या अधिवेशनात महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. या अधिवेशनासाठी रामकुवर व जाधव परिवाराने ११०० रुपयांचा निधी संघटनेला दिला.
हिंगोणे बुद्रुक येथील रामकुवर परिवार व शिंदखेडा येथील जाधव परिवार यांनी आपल्या परिवारात पहिलाच सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध करून क्रांतीची सुरुवात केलेली आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या क्रांतीकारी सोहळ्यासाठी सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, जळगाव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.