सटाणा येथे सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने गृहप्रवेश संपन्न !…

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

घांगळे ( कोळीaस ) कुटुंबीयांचा क्रांतिकारी निर्णय !… – हरी अण्णा जाधव ( सरपंच )

३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला अहिल्यानगर येथे ४२ वे सत्यशोधक समाज संघाचे राज्य अधिवेशन होणार – सत्यशोधक भगवान रोकडे.

प्रतिनिधी –

सटाणा –  सटाणा येथील फुले नगर, भाकशी रोड, सटाणा येथे महात्मा जोतीराव फुले निर्मित सार्वजनिक सत्यधर्मीय विधीनुसार सत्यशोधक नुतन गृहप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम समस्त बहुजन समाजाचे दैवत खंडोबाची तळी उचलून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर श्री एकनाथ घंगळे आणि सविता घंगळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करून नुतन गृहप्रवेश करून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, बिरसा मुंडा, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते भगवान रोकडे रा.चाळीसगांव यांच्या हस्ते सत्यशोधक पद्धतीने नुतन गृहप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या नुतन गृहप्रवेश कार्यक्रमासाठी राजेंद्र आहिरे साहेब सटाणा आगार व्यवस्थापक चेतन वनीस, सटाणा भक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच हरी अण्णा, मुंजवाड सरपंच मनिषा यादव घांगळे. आदिसी महिला संघटना अध्यक्ष समता परिषद युवा कांग्रेस चे सरचिटणीस सटाणा वैभव गांगुर्डे, पेठचे यादव घांगळे सर, प्रकाश घांगळे सर, दिगंबर आहिरे मुंजवाड, यशवंत कात्रे साहेब समता परिषद, सुदर्शन जाधव, वैभव गांगुर्डे (समता परिषद तालुका अध्यक्ष), श्री.आहिरे आगार (प्रमुख सटाणा), हरी आण्णा जाधव (सरपंच मुंजवाड), सौ. नलिनी बागुल (राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका), मनिषा घंगळे (पेठ तालुका मनसे अध्यक्ष), वसीम बेग (ग्रामपंचायत सदस्य), सटाणा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व आप्तेष्ट – नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नुतन गृहप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने सत्यशोधक समाज पुरस्कृत सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे यांनी सत्यशोधक समाज संघाच्या संदर्भात विस्तृत माहिती सांगून प्रबोधन केले. येत्या दि. ३० नोव्हेंबर, व दि. १ डिसेंबर २०२४ सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर (अहमदनगर) पार पडणार आहे या अधिवेशनात महाराष्ट्रातील सत्यशोधकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. या नुतन गृहप्रवेश निमित्त घांगळे परिवाराने २१०० रुपयांचा सहयोग निधी संघटनेला दिला.
सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार सत्यशोधक पद्धतीने नुतन गृहप्रवेश केल्याबद्दल घांगळे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!