निर्भीड विचारांचे मराठी लाईव्ह न्युज.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर मराठी लाईव्ह न्युज चा आज पाचवा वर्धापन दिवस संपन्न होत आहे. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. त्यामुळे पत्रकारितेमुळे लोकशाहीची पाळीमुळे खोलवर रुजत असतात .जगाच्या कानाकोपऱ्यात आज डिजिटल मीडियाने आपले चोक काम बजावले आहे. पत्रकारितेमुळे अनेक समाज परिवर्तने होताना आपल्याला दिसून येतात. सत्ता बदलाचे बळ पत्रकारितेमध्ये दिसून येथे. त्यामुळे भ्रष्ट सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे काम पत्रकारितेत असते. अनेक सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम पत्रकार करीत असतात.
अमळनेर येथील मराठी लाईव्ह न्युज अशाच प्रकारचे काम करीत आहे.मराठी लाईव्ह न्युज चे संपादक आदरणीय ईश्वर महाजन सरांनी मराठी लाईव्ह च्या माध्यमाने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.शांत संयमी व आपल्या मधाळ वाणीने अनेक मोठा गोतावळा सरांनी निर्माण केलेला आहे.आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमाने सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम ईश्वर महाजन करीत असतात .सामाजिक चळवळींना बळ देण्याचे काम मराठी लाईव्ह न्युज च्या माध्यमाने होत असते .या कामी साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी अजय भामरे व्हॉइस ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले तसेच सर्व व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार बंधूंचे मोलाचे योगदान ईश्वर महाजन सर यांना लाभत असते मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा