व्हाईस ऑफ मीडिया व मंगळ ग्रह सेवा संस्थान मतदार जनजागृती रथाचा अनोखा उपक्रम.
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखविला हिरवा झेंडा.
आज दिनांक 5 रोजी मतदानासाठी जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदान जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखविला. मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून हा मतदार जनजागृती रथ फिरणार आहे .त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लागेल. हा उद्देश या मतदान जनजागृती रथाचा आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी भीमराज दराडे ,व्हाईस ऑफ इंडियाची प्रदेश सरचिटणीस डॉ दिगंबर महाले ,सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे ,जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड़, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ,जैन उद्योग समूहाचे मीडिया डायरेक्टर अनिल जोशी ,तहसीलदार डॉक्टर कोळी, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील सर ग स पत पिढीचे संचालक राम पवार ,वाईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेश कुमार काटे ,तालुका अध्यक्ष उमेश काटे ,अजय भामरे ,ज्येष्ठ सल्लागार विवेक अहिराव ,उमेश धनराळे ,मिलिंद पाटील जयंतलाल वानखेडे ,बापूराव ठाकरेंचे, शरद कुलकर्णी, दिनेश नाईक, दयाराम पाटील ,जगदीश पाटील ,उमाकांत ठाकूर राहुल पाटील, किरण चव्हाण ,संजय पाटील ,हेमंत वैद आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की मंगळ ग्रह सेवा संस्थान वाईस ऑफ मीडियाने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घ्यावा. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडियाचे कौतुक केले.” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो “या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.